२९ जुलैला बारामतीत एल्गार मोर्चा : ओबीसी समाज कृती समिती व अखिल भारतीय समता परिषदेची बैठक

Admin

मोरगाव :  प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

मोरगाव ता .बारामती येथे आज ओबीसी समाज कृती समिती व अखिल भारतीय समता परिषदेची बैठक संपन्‍न झाली.  ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण व आगामी 29 जुलै रोजी बारामती येथे होणाऱ्या एल्गार मोर्चाच्या बाबतचे नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आले .
        आज मोरगाव येथील मयुरेश्वर मंगल कार्यालयामध्ये ओबीसी समाज कृती समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी पुणे जिल्हा अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष अनिल लडकत,  मोरगावचे सरपंच निलेश केदारी ,  बापुराव सोनलकर  ,सुनील ढोले , दत्ता लोणकर , नाना नेवसे , पांडुरंग गारडे , जय मल्हार संघटनेचे गणपत आबा देवकाते  आदी उपस्थित होते  .सर्वोच्च न्यायालयाने  ओबीसी आरक्षण रद्द केलेले असल्याने याबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी ओबीसीची जनगणना करुन  इंपिरियल डाटा  एकत्र करून ओबीसी समाजाची माहिती ही सर्वोच्च न्यायालय द्यावी . तसेच ओबीसीचे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे . याबाबतचा ठराव   या बैठकीमध्ये  संपन्न करण्यात आला.
तसेच आगामी काळात ओबीसी समाजाच्या विविध अडचणी , समस्या याबाबतही चर्चा झाली . दिनांक 29 जुलै रोजी बारामती येथे होणारे  ओबीसी समाज बचाओ एल्गार मोर्चा साठीचे नियोजन करणे आवश्यक  असल्याचे मत अनिल लडकर यांनी यावेळेस व्यक्त केले . तसेच बारामती येथे   हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे ठरले.

To Top