सासवड जवळील "या" खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद : नेपाळमधून आवळल्या मुसक्या

Admin
पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 
जगभरात स्विझरलॉंड व मुंबई पोलीसांचे गुन्हे तपासात मोठे नाव आहे. त्याच धर्तिवर पुणे जिल्ह्यामधील सासवड पोलीस स्टेशनच्या सिंघम पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत नेपाळमध्ये जाऊन, प्रतिकूल परिस्थितीत, वेशांतर करत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम भोर व पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी या धडाकेबाज कारवाई केल्याने पुरंदर तालुक्यातून या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. 
          आज गुरवार दि. १५ रोजी भोर - पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी व  सासवड पोलीस स्टेशनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार.  दि.९ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोनोरी रस्त्यावर बोरकरवस्ती लगत एका नाल्याच्या ठिकाणी भगवान मारकड याच्या मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात घातक शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. मयत भगवान मारकड यांच्या पत्नी छाया भगवान मारकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवड पोलीस स्टेशन येथे दि. ९ जुलै  रोजी खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे स्वतः करीत होते. 

          हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट देऊन पोलिसांना त्वरित गुन्हा उघड करण्याबाबत आदेश दिले होते. भगवान मारकड हा सोनोरी रोडवरील एका रिमोल्डिंग टायरच्या दुकानात मजुरीने काम करीत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो नेहमी दारू पीत होता. दारू पिण्याच्या मध्ये भांडणे होऊन त्याचा खून झाला असावा असा पोलिसांना संशय वाटत होता. ज्या ठिकाणी प्रेत सापडले होते तेथून जवळच असलेल्या सचिन बोरकर यांच्या घरामध्ये नेपाळी निरंजन सहानी सासवडमध्ये फर्निचरचे काम करीत होता. तो भाड्याने राहत होता. निरंजन सहानी हा इसम गुन्हा झाल्यापासून गायब असल्याचे पोलिसांना समजले. तो धागा पकडून त्याचे व महेश भगवान यांचे काही संबंध होते का याबाबत पोलिसांनी तपास केला.

        यावेळी अशी माहिती मिळाली की, हे दोघे जण दारू पीत होते. पार्टी करीत असायचे घटनेच्या आदल्या दिवशी मयत भगवान व संशयित फर्निचरचे काम करणारा नेपाळी निरंजन सहानी याने सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या रूमवर दारू मटण पार्टी केली. पार्टी सुरू असताना दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरून बोलाचाली वरून वाद निर्माण झाला व निरंजन सानियाने लाकडी दांडक्याने बागवान मार्कड याच्या डोक्यात मारहाण केली. भगवान मारकड यात गंभीर स्वरूपाची दुखापत झाली व रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर निरंजन याने त्याचे प्रेत ओढत कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी नाल्यामध्ये फेकून दिले व रात्री मोटरसायकलने नेपाळकडे रवाना झाला. 

सासवड पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती मिळताच त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम भोर व पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव असे पथक नेपाळ करता रवाना झाले. नेपाळ बॉर्डरवर पोहोचण्या पूर्वी आरोपी हा घरी नेपाळ येथे पोचला होता. नेपाळमध्ये जाऊन आरोपीला अटक करून शकत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी खूप तांत्रिक अडचणी आल्या होत्या स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते. अशा वेळी मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर तुषार यांनी अतिशय मोलाचे तांत्रिक मदत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी आपल्या कौशल्य व अनुभव पणाला लावून आरोपीला नेपाळ बॉर्डरवर अत्यंत चलाखीने ताब्यात घेतले व सासवड येथे आणले आरोपी निरंजन सहानी यास १३-७-२१ रोजी अटक केली असून १९ तारखे पर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 
आरोपीला विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत. अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा पोलिसांनी पाच दिवसात उघडकीस आणला गुन्ह्याचे तपासी काम व आरोपीला अटक करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन केले. सासवड पोलिस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस निरीक्षक विनायक झिंजूर्के, पोलीस हवालदार संदिप  चांदगुडे, पोलीस हवालदार साईनाथ भिसे, पोलीस नाईक सुरज नांगरे, पोलीस निलेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम भोर यांनी उघडकीस आणण्यासाठी अतिशय कसोशिचे प्रयत्न केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
To Top