वाघळवाडी येथे अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चारशे झाडांचे वृक्षारोपण तसेच कोविड योद्धाचा सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

वाघळवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, वृक्षारोपण, झाडांचे संवर्धन व कोविड योध्दाचा सत्कार, कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
         निरा बारामती रस्त्याच्या दोन्ही बाजूला मु.सा.काकडे महाविद्यालय आणि विद्या प्रतिष्ठान शाळेच्या लगत, तसेच वनविभागाच्या ठिकाणी मोकळ्या जागेत ग्रामपंचायतीच्या पाणी टाकी जवळ चारशे झाडांचे वृक्षारोपन  करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, सरपंच नंदा सकुंडे, सतिश सकुंडे, अजिंक्य सावंत, संजय शिंदे, महादेव सावंत, केशव जाधव,  सुनिल पाटील, सुचेता साळवे, पांडुरंग भोसले,हेमंत गायकवाड, तुषार सकुंडे, अनिल शिंदे,राजेंद्र काशवेद,कृष्णा कोळेकर,शिवाजीराव सावंत,विजय गायकवाड,सुभाष शिंदे,चेतन गायकवाड,रोहिदास कोरे,बाळू मोटे,नितीन शेंडकर,परवेझ मुलानी, रामचंद्र जाधव,जालिंदर सावंत, संजय  जाधव, सुभाष सावंत, सोमनाथ मांगडे,पंकज सावंत,चेतन कोळपे,बबलू धुमाळ,चैतन्य सावंत, गणेश शिंदे,समीर जाधव, अनिकेत शेंडकर, प्रमोद सावंत,गणेश कनुजे,संतोष भोसले, आदी सकाळी सहा वाजता सोमेश्वरनगर परिसरातील- गावातील मान्यवर, तरुण, ग्रामस्थ, महिला,  पोलीस/आर्मी भरती प्रशिक्षण करणारे युवक, मुली, शिक्षक, आरोग्य कर्मचारी अश्या जवळपास दीडशे जणांनी चारशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 
             वृक्षप्रेमी असलेल्या अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार यामध्ये चिंच, बकुळ, बहावा, कैलासपती,पिंपळ, वड, करंज, जांभूळ, कडूलिंब, आंबा, ताम्हण,इंडियन ख्रिसमस, बुच, चाफा, कांचन, गुगुळ, चेरी सिंगापूर अशी झाडे लावण्यात  आली आहेत. लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन करण्याचा दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपस्थित असलेल्या सर्वानी संकल्प केला.वृक्षारोपणसाठी तिरुपती बालाजी अग्रो प्रॉडक्ट्'च्या वतीने संजय शिंदे यांनी खत उपलब्ध करून दिले.
          तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत 'कोविड योध्दा' म्हणून सन्मानपत्र, शाल,नारळ ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या दोनशे झाडांचे 'वृक्षसंवर्धन' करण्यात आले आहे.तसेच यावर्षी लावण्यात आलेल्या चारशे झाडांचे ठिंबक च्या माध्यमातून पाणी देण्यात येणार असून वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे.
To Top