उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वसामान्य घटकाचा व तळागाळातील प्रत्येकाचा विचार करणारा एक आदर्श नेता : विश्वास देवकाते

Admin
मोरगाव : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------

 सर्वसामान्य घटकाचा व तळागाळातील प्रत्येकाचा विचार करणारा एक आदर्श नेता  म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार हे सर्व परिचित आहेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले ते मोरगाव येथे एका कार्यक्रमप्रसंगी  बोलत होते .          बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा वाढदिवस यंदा आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला . मोरगाव , तरडोली , मुर्टी , आंबी , लोणी भापकर , माळवाडी आदी परीसरात आज  वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण  , कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान व  भेटवस्तू  देऊन कार्यक्रम संपन्न झाला . मोरगाव येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पुणे  जिल्हा  परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते , पंचायत समीती बारामतीच्या सभापती निताताई फरांदे , मोरगावचे सरपंच निलेश केदारी , उपसरपंच  वैशाली पालवे , पोलीस पाटील नयना नेवसे  , ग्रामसेवक मोरेश्वर गाडे , ग्रामपंचायत सदस्य व  कोव्हीड योद्धे उपस्थित होते .
         तर तरडोली येथे पंचायत समीती सदस्य राहुल भापकर , सरपंच नवनाथ जगदाळे , उपसरपंच महेंद्र तांबे , पुणे जिल्हा परीषद जलव्यवस्थापन समीती सदस्य हनुमंत भापकर , निरा कृषी उत्पन्न बाजार समीती माजी सभापती भाऊसाहेब कांबळे ,  किसन तांबे ,  ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवीका रुपाली मेहेत्रे  उपस्थित होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लाभार्थीना फॅन व थंड पेय जारचे वाटप करण्यात आले .
        यावेळी बोलताना देवकाते म्हणाले की , सर्वसामान्य घटकांचा विचार करणार एक आदर्श नेता म्हणून अजित पवार हे राज्यभर प्रसिद्ध आहेत . तसेच आज ,आता , ताबडतोब असा निर्णय घेणारे राज्यातील एकमेव नेता असल्याचे देवकाते यांनी सांगितले. मोरगाव येथे आज पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने वृक्षारोपण , आरोग्य , पोलीस , पत्रकार , महसूल , आशा वर्कर , अंगणवाडी सेवीका , प्राथमिक शिक्षक आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले  कार्यक्राचे सुत्रसंचालन सोमनाथ कदम  यांनी तर शेवटी आभार सरपंच निलेश केदारी यांनी मानले .
To Top