कामगारांचे मोफत कोरोना लसीकरण करणारा 'सोमेश्वर' ठरला राज्यातील पहीला कारखाना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ज्या कामगारांना कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस मिळाला अशा कामगारांसाठी  तब्बल ३ लाख २० हजाराच्या ४०० डोस खरेदी करून लसीकरण करण्यात आले. 
         उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा शुभारंभ सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, लालासाहेब माळशिकारे, सिद्धार्थ गीते, लक्ष्मण गोफणे, ऋतुजा धुमाळ, कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ प्रणाम भोसले यांच्यासह कामगार उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष जगताप म्हणाले, सहकार चळवळ मोडीत निघणार असे बोलले जात असताना माजी कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात सहकाराचे जाळे भक्कम पणे उभे आहे. या सर्व सहकारी संस्थाच्या माध्यमातून सर्वसामान्यानं न्याय मिळवून देण्याचे काम होत आहे. १९९२ च्या सोमेश्वर च्या सत्ता पालटानंतर कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कायापालट झाला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव हे दोन सहकारी साखर कारखाने ऊसउत्पादक, कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांचा न्याय देण्याचे काम करत आहेत. तसेच कामगारांना आपल्या हक्काचं देण्याचं काम नेहमी संचालक मंडळ करत आहे. पगारवाढ असो, नवीन कामगार वसाहत, कामगार आरोग्य  विमा, कोविड मोफत लसीकरण असो संचालक मंडळाने कामगारांना नेहमीच न्याय दिला आहे. सोमेश्वर कारखाना कामगारांना मोफत लसीकरण करण्याबाबत राज्यात आदर्श आणि एकमेव असल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच सोमेश्वर कारखान्याने कामगारांचे २७ लाख रुपये खर्च करून कामगारांचे आरोग्य विमे उतरवले होते. या विम्याचा अनेक कामगारांना ५२ लाखापर्यंत परतावा मिळाला आहे. असे जगताप यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन यादव यांनी केले. प्रस्तावित कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी केले तर आरोग्य अधिकारी डॉ मनोहर कदम यांनी आभार मानले. 

.......आणि दादांनी तो शब्द केला खरा 
कारखान्यांवर कर्जे होती असा अशा परिस्थितीत अजितदादांनी आपली आमदारकी पणाला लावली होती. कारखाने कर्जमुक्त झाल्यावरच विधानसभेची निवडणूक वाढवेल आणि दादांनी तो शब्द खरा करून दाखवला अशी आठवण अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितली.
To Top