वाणेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते तर करंजेपुल (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वैभव गायकवाड यांच्या हस्ते परिसरातील कोरोना योद्द्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करंजेपुल व वाणेवाडी ग्रामपंचतीने पंचक्रोशीत कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अजितदादा कोविड सेंटर उत्तमरीत्या चालविल्याबद्दल रामराजे सोसायटीचे सचिव किरण जगताप, सहसचिव प्रदीप जगताप यांचाही प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाणेवाडी येथे सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण भोसले, रामराजे सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप, उद्योजक सुनिल भोसले, सरपंच स्मिता काकडे, उपसरपंच संजय जगताप, ग्रामसेवक पी. के. गाढवे, गोपाळ चव्हाण, बाबासाहेब भोसले, राजू घोरपडे, पोपट जगताप उपस्थित होते. तर करंजेपुल येथे उपसरपंच निलेश गायकवाड, सदस्य लतीफ मुलाणी, सविता लकडे, रमेश येवले, उषा जाधव, ग्रामसेवक आबासाहेब यादव, श्रीकांत शेंडकर, गणेश गायकवाड, सूर्यकांत गायकवाड उपस्थित होते. या ठिकाणी तलाठी दादासाहेब आगम, कोतवाल तानाजी जाधव यांचाही सत्कार झाला.
वाणेवाडी येथे बोलताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले,
अजितदादांसारखे नेतृत्व बारामती तालुक्याला लाभले हे सर्वांचे भाग्य आहे. सहकार, साखर उद्योग ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणणारा असे हे नेतृत्व आहे.