पुरंदर ! निरा येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला अजित पवार यांचा वाढदिवस

Admin
पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम---   

निरा (ता.पुरंदर) येथे आज दि. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नीरा ग्रामपंचायतीसमोर तसेच फुटपाथच्या कडेने वृक्षारोपण करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नीरा  ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष नाना जोशी यांच्या मार्गदर्शन खाली हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच  सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार, अपंग संघटना, ज्येष्ठ नागरीक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
         यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, कांचन निगडे, बापूराव पाटोळे, शामाराजे कुंभार रशीदभाई सय्यद रज्जाकभाई बागवान, धनंजय काकडे प्रकाश कदम, तनुजा शहा, निरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य इत्यादी उपस्थित होते.
         यावेळी बोलताना उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की,आज खर्या अर्थाने आपण नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट ची आपण पाय भरणी केली आहे.
To Top