सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार बारामती तालुक्याच्या खासदार.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दूरदृष्टी नेतृत्वाची व त्यांच्या कार्याची ओळख उमलत्या नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने विद्यार्थीदशेतील व युवकांच्या नव्या जाणिवा, सृजनशीलतेला वाव,कल्पकतेची भरारी चित्रकलेच्या माध्यमातू्न व्यक्त व्हावी म्हणून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा. पुरूषोत्तम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आधार सोशल फाउंडेशनने या हा उपक्रम राबविला होता.या चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातून पाचशे स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.विजयी स्पर्धकांना .पुरुषोत्तम जगताप, दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण,.करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड,.संकेत जगताप या मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा निकाल
* लहान गट :-
१ क्रमांक - सानिका धनंजय पाटील (नंदुरबार)
२ क्रमांक- समीक्षा सुधीर काटे ( रुई,बारामती)
३ क्रमांक- अनुजा उध्दव नागरगोजे (कसबा, बारामती)
* महाविद्यालयीन गट :-
१ क्रमांक - ऋतुजा रामदास माने देशमुख (श्रीपुर, माळशिरस)
२ क्रमांक - केतन दिपक शेवाळे (मोकभणगी, कळवण, नाशिक)
३ क्रमांक - अनुराग बाबाजी गोडे ( सिन्नर, नाशिक)
३ क्रमांक - प्रसाद गणेश आव्हाड (सिन्नर, नाशिक)
* खुला गट :-
१ क्रमांक - शिखरे भागूजी विठ्ठल ( हडपसर, पुणे)
२ क्रमांक - पियुष प्रदीप सुर्यवंशी ( ओतूर, जुन्नर)
३ क्रमांक - अविराज यशवंत गोरीवले ( मालाड, पश्चिम मुंबई)
या स्पर्धेचे परीक्षण श्री. महेंद्र दिक्षित, श्री. स्मितील पाटील (कोल्हापूर) यांनी केले तर फाऊंडेशन चे सदस्य रोहित जगताप, स्वप्नील काकडे,विकास नवले यांनी यशश्वी आयोजन केले.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य श्री.एस.एस.गायकवाड सर व ऋषीकेश चव्हाण यांनी केले.