बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांचेकडून शेंडकरवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची तपासणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

शेंडकरवाडी (ता. बारामती) येथे माजी ग्रामपंचायत सदस्य कै.  माणिकराव शेंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
        यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी करत त्याच्या आणखी विकासासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला. कै. माणिकराव शेंडकर यांचा स्मृतिदिन विधायक पद्धतीने साजरा करताना हनुमान मंदिर, पशुवैद्यकीय दवाखाना, स्मशानभूमी अशा विविध ठिकाणी आंबा, चिंच, वड, करंज, लिंब अशा मोठ्या झालेल्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. राज्य पणन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शामकाका काकडे व जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक रुपचंद शेंडकर, करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड, सोरटेवाडीचे सरपंच दत्ता शेंडकर उपस्थित होते. 
            याप्रसंगी प्रमोद काकडे यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील सोयी सुविधांची तपासणी केली. डॉ. रुपाली जाधव, मेजर शिंदे यांनी माहिती दिली. काकडे यांनी कामकाज चांगले केल्यास दवखान्यासमोर पेव्हर ब्लॉक व शेड करून दिले जाईल तसेच अन्य समस्याही सोडवू असे आश्वासन दिले.
To Top