पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन

Admin
बारामती : सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

केंद्र सरकारने जनतेला खोटी आश्वासने व मोकळ्या थांबून थापा मारून गेल्या सात वर्षापासून संपूर्ण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावलेली आहे. पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्य जनतेचे जीवन आर्थिक दृष्ट्या हतबल केले आहे. या सर्व बाबींमुळे कधी नव्हती एवढी महागाई प्रत्येक गोष्टींमध्ये वाढलेली आहे अशा परिस्थितीत सामान्य जनता बेचेन झालेले आहे. नवीन रोजगार निर्मिती न करता लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारची करवाढ लावून प्रचंड दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास काढण्याचे महापाप या सरकारने केले आहे.अशा सामान्य गोरगरीब जनतेशी असंवेदनशीलपणे वागणाऱ्या या केंद्र सरकारचा बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत असल्याचे मतं बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केले. 
तसेच सततच्या वाढत्या महागाईमुळे
 केंद्र सरकारचा सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. डिझेल व घरगुती गॅस दरवाढ कमी करावी अशा मागणीचे निवेदन केंद्र सरकार दरबारी पोहचवावे म्हणून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले.
यावेळी इम्तियाज शिकीलकर,विश्वासराव देवकाते, बाळासाहेब तावरे, मदन देवकते, प्रमोद काकडे ,नीता फरांदे, पोर्णिमा तावरे,रोहित कोकरे,प्रशांत काटे, शिवाजीराव टेंगले, संदीप जगताप,वसंत गावडे, धनवान वदक राजवर्धन शिंदे, राहुल वाबळे,अध्यक्ष अमर धुमाळ,वनिता बनकर,अनिता गायकवाड, पोपटराव पानसरे,संजय भोसले, अनिल खलाटे,अँड.अविनाश गायकवाड,किरण तावरे, वैभव मोरे,रवींद्र माने, तुषार कोकरे, राहुल कदम,साधू बल्लाळ,सुनिल बनसोडे,अविनाश भिसे, जितेंद्र काटे,आरती शेंडगे,भाग्यश्री धायगुडे,मिलिंद मोरे,सुचिता साळवे, दिपाली पवार,शबीर शेख,आदींसह सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
To Top