सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : सचिन पवार
बारामती तालुक्यातील कारखेल गावामध्ये कोरेश्वर मंदीर परिसरात रात्रीच्या पाऊसात विज पडल्याने जमिनीतुन बोअरवेल प्रमाणे पाण्याचा प्रवाह निघाला आहे ,
याठिकाणी कोरेश्वर मंदीर परिसरात मेंढपाळ बकरी चराई करता असताना अचानक समोर जमिनीतुन पाण्याचा वाहताना दिसला आहे , या प्रवाहाने याठिकाणी मोठया प्रमाणात पाण्याचा साठा पाहण्यात येत आहे ,
या घटनेने परिसरात कुतुहलाचा विषय झाला असुन स्थानिक लोक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत, याप्रसंगी मेंढपाळ किसन तांबे सह ग्रामस्थ उपस्थिती होते ,