सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून पालखी सोहळा पायी चालत न जाता वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे .त्याचे हे दुसरे वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागांतून अनेक पालखी सोहळे निघत असतात संत सोपानकाका महाराज यांची पालखी सोहळा सासवड येथून प्रस्थान करतो या सोहळ्यात तीन-चार मुक्काम पडल्यानंतर वारकरी ,भाविक व ग्रामस्थ यांना आतुरता असते सोमेश्वरनगरी मध्ये पालखीचे आगमन होण्याची व मु.सा काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्या सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाची महाराजांचा अश्व गोल रिंगणामध्ये धावतो . . . अन उपस्थितांचे डोळ्यांचे पारणे फेडत असतो पण ही अनुभूती मागील दोन वर्षांपासून वारकरी व स्थानिक ग्रामस्थांनी मुकले आहेत.
या कोरोना महामारीचा लवकरात लवकर नायनाट व्हावा व पालखी सोहळा पुन्हा वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये पार पडावा यासाठी विठुरायाकडे सर्वजन प्रार्थना करीत आहेत .
शेकडो किलोमीटरचे अंतर चालत जाऊन मुक्काम दर मुक्काम करत अनेक दिवसाच्या एकूण प्रवासात वारकऱ्यांसाठी रिंगणाला मोठे महत्त्व आहे. थकल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी खेळाच्या माध्यमातून थकवा दूर करण्यासाठी रिंगणाची सुरुवात झाली खरी, मात्र हेच रिंगण सोहळे आज या वारीतील सर्वोच्च आनंद देणारे ठरत आहेत. केवळ वारकऱ्यांसाठीच रिंगणाचे महत्त्व आहे, असं नाही तर हा रिंगण सोहळा अनुभवणाऱ्यांसाठी ही जणू पर्वणीच असते.या पर्वणीलाच मागील दोन वर्षांपासून मुकले आहेत.