बारामती कृषी महाविद्यलयातील कृषी कन्येकडून होळ येथे वृक्षारोपण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

 बारामती तालुक्यातील होळ ( वायाळ पट्टा ) येथे बारामती कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या यांच्या वतीने देशी वाणाची झाडे लावण्यात आली . 
          यावेळी जांभूळ , बकुळ , अर्जुन , बेल , पिंपळ इ .ग्रामिण कृषी कार्यनुभव कार्यक्रामांतर्गत वायाळ पट्टा येथे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती कृषी महाविद्यालयाची बारामती  विद्यार्थिनी चतुर्थ वर्षा मध्ये शिक्षण घेत असलेल्या पूर्वा वायाळ हिने दिली .             याप्रसंगी सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. यामुळे या कृषिकन्या आपआपल्या गावात असे उपक्रम राबवत आहेत. 
        याप्रसंगी सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालिका.हिराबाई वायाळ , माजी ग्रामपंचायत सद्स्य  बच्चन आटोळे . सागर वायाळ ,  अमोल वायाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
To Top