सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा देवघर धरणक्षेत्राच्या परिसरात काल व आज देखील
पावसाचे तुफान सुरूच राहिले. आज दिवसभरात ११७
मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण साखळीत मोठ्या
प्रमाणावर पावसाच्या पाण्याची आवक होत असल्याने आज
संध्याकाळी सहा वाजता पॉवर हाऊस मधील ८००
क्युसेक्स प्रतिसेकंद क्षमतेने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत
सोडण्यात आला. दरम्यान आज दिवसभर पाण्याचा वेग व
पावसाच्या पाण्याची आवक जास्त राहिल्याने उद्या
कदाचित नीरा नदीतून पाण्याचा विसर्ग करावा लागेल अशी
स्थिती आहे.
जलसंपदा विभागाने काल संध्याकाळी नदीकाठच्या
लोकांना इशारा दिला होता. त्याच बरोबर बारामती, इंदापूर,
पंढरपूर, सांगोला, फलटण या तालुक्यातील नदीकाठच्या व
कालव्याकाठच्या भागातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा
दिला होता. तो सतर्कतेचा इशारा कायम असून घाटाच्या
भागात पडत असलेल्या पावसामुळे नीरा नदीच्या प्रवाहात
कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते त्याकरता हा सतर्कतेचा
इशारा कायम ठेवण्यात आलेला आहे.