पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
वीर धरण क्षेत्रातील गावांमध्ये व निरा नदिच्या धरण साखळीमध्ये गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातून रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. शनिवारी पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वीर धरण विद्युत गृहातून रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. रात्री १२:३० धरणाच्या सांडव्यातून वाजता ४,६३७ क्युसेक्स वेगाने, २ वाजात विसर्गाच वेग वाढवून १२,४०८ क्युसेक्स, तर पहाटे ६:०० वाजता २१ हजार ५०५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. तसेच याकाळात नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असे आव्हाण निरा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.