बिबट्या काही पाठ सोडेना ! रात्री सोरटेवाडीत बिबट्याचे दर्शन : बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

गेल्या दोन महिन्यांपासून वाकी, चोपडज, मगरवाडी, कानाडवाडी, सोरटेवाडी परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले आहे. 
             गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात वाकी येथे एक कालवड बिबट्याने फस्त केले आहे. काल रात्री सोरटेवाडी येथे अनिल वसंत सोरटे यांच्या घराच्या मागे रात्री साडेअकरा वाजता बिबट्याने दर्शन दिले.
To Top