बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
बारामती तालुक्यातील वाढती कोरोनाचा संख्या लक्षात घेता, पुणे शहर आणि इतर तालुक्याप्रमाणे बारामती तालुका देखील आठवड्यातील शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
आज १० वाजता याबाबत मिटिंग मध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासकीय स्तरावरून देखील लॉकडाऊन करण्याबाबत दुजोरा मिळत आहे.
करोना महामारीत दुसर्या लाटेत लॉकडाउन मध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात आली आहे .ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी होत असून मास्क सॅनिटायझर वापरण्यात नागरिकांकडून बेफिकिरी पहावयास मिळत आहे त्याचाच परिणाम संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र बारामती तालुका व ग्रामीण भागात दिसून येत आहे .
प्रशासन त्यांच्या परीने योग्य त्या उपाययोजना करत आहेत कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाकडून काही ठिकाणी निर्बंध कडक करण्यात येणार असून व काही ठिकाणी लॉक डाऊन लावण्याची शक्यता आहे.