सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील १९८० साली मुरूम, वाणेवाडी व वाघळवाडी ग्रुप ग्रामपंचायतने चालू केलेल्या वाणेवाडी येथील आठवडे बाजार उद्या दि १८ रोजी ४२ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
१५ डिसेंबर १९८३ ला या तिन्ही ग्रामपंचायत वेगळा करण्याचा निर्णय झाला तसा आदेशही निघाला मात्र प्रत्येक्ष तिन्ही पंचायत चा कारभार वेगळा सुरू होण्यास मार्च १९८४ साल उजाडले. मात्र वाणेवाडी ग्रामपंचायत कडे बाजारासाठी जागा उपलब्ध असल्याने आठवडे बाजार हा वाणेवाडी याठिकाणीच ठेवण्याचा निर्णय झाला. या बाजार उद्या ४२ वर्षात पदार्पण करत आहे.
त्यावेळचे ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच भगवानराव कदम, उपसरपंच अशोक यादव व ग्रामसेवक व्ही जी जाधव यांनी आठवडे बाजारविषयी परिपत्रक जाहीर केले होते. यामध्ये म्हणटले होते की, मौजे मुरूम, वाणेवाडी व वाघळवाडी येथील आठवडे बाजार दर शुक्रवारी भरला जाईल त्याची सुरुवात दि १८ जुलै १९८० पासून होत आहे. संबंधित व्यापारी व ग्राहक शेतकरी बंधू यांनी बहुसंख्येने येऊन बाजारास सहकार्य करावे. तसेच याच ठिकाणी शेळ्या मेंढ्यांचा देखील बाजार भरवण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे.
या तिन्ही ग्रामपंचायत चे विभाजन झाल्यानंतर सरपंचपदी बाळासाहेब जगताप तर उपसरपंचपदी रमेश चव्हाण यांनी सूत्रे सांभाळली होती.