मुरूम येथील तालीम पाडून राजकारणासाठी जेष्ठ नागरिक भवन बांधण्याचा घाट : ग्रामस्थ प्रशिल जगताप यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे धाव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील मुरूम येथील  ग्रामपंचायतच्या मालकीची जुनी भैरवनाथ तालीम बेकायदेशीररीत्या पाडली असून ठिकाणी राजकारणासाठी जेष्ठ नागरीक भवन बांधण्याचा घाट सुरू आहे. याबाबत मुरूम येथील ग्रामस्थ प्रशिल प्रकाश जगताप यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे धाव घेतली आहे. 
               प्रशिल जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार व ग्रामपंचायत मुरूम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुरूम ग्रामपंचायतची जुनी तालीम गावातील सर्वोच्च अश्या ग्रामसभेचा कोणताही ठराव न करता व विद्यमान सरपंच यांनी तालीम पाडताना विरोध केला असताना सुद्धा मुजोरशाहीने जेसीबीच्या साहाय्याने तालीम पाडली व साहित्याचा निलाव करण्याचा अधिकार ग्रामपंचायतचा असताना सुद्धा तालमीच्या साहित्याचा परस्पर निलाव केला व कायदा हातात घेतला व तालमीच्या ठिकाणी राजकारणासाठी जेष्ठ नागरिक भवन बांधण्याचा घाट घातला आहे. गावात पहिला जेष्ठ नागरिक संघ असताना केवळ राजकारणासाठी पैशाच्या जोरावर दुसरा जेष्ठ नागरिक संघ स्थापन केला व गावातील जेष्ठांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला सदर कृती कायद्याच्या दृष्टीने व गावहिताच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे सदर तालमीत बरेच तरुण मल्ल व्यायाम करतात व विविध ठिकाणी कुस्त्या करून गावचे नाव सर्वत्र गाजवतात व याच गावातून कुस्ती क्षेत्रात राष्ट्रीय पदक गावच्या एका मल्लाने मिळविले आहे अशा गावच्या अभिमानाच्या एवढ्या गोष्टी असताना तालीम कशासाठी पाडली या सर्व बाबींचा गंभीरपणे विचार करून ग्रामपंचायतने पुढील योग्य ती कारवाई तातडीने करावी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत ने कारवाई न केल्यास सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार राहील कारण याच गावात सार्वजनिक कामात कायदा हातात घेऊन परस्पर बदल करण्याचा गंभीर प्रकार याच गावात घडला आहे सदर प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाने समंधीतांवर चौकशी करून गैर कामाचा ठपका ठेवला होता व या गावचे सरपंच पद अपात्र होणेपर्यत सदर प्रकरण गेले होते व सदर प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करून सदर काम नियमित करून घेतले आहे तरी या सर्व गंभीर बाबींचा विचार करून तातडीने नियमानुसार योग्य ती कारवाई करावी ही विंनती.

 इंदुमती भगत : सरपंच मुरूम ग्रामपंचायत
ही इमारत ग्रामपंचायतच्या मालकीची असून ती इमारत पाडण्यासाठी आम्ही विरोध दर्शविला होता. कायदेशीर बाबी पूर्ण करून इमारत पाडणे आवश्यक होते. याबाबत पंचायत समितीची परवानगी घ्यावी लागते. लेखी देतो बोलले होते. तेदेखील देण्यात आले नाही.
To Top