वेश्याव्यवसाय करणा-या त्रिमूर्ती लाॅज सील करण्याचे प्रांतअधिकारी यांचे आदेश

Admin
दौंड
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दौंड तालुक्यातील बोरीभडक हद्दीत असलेल्या त्रिमूर्ती लॉजवर मागील कित्येक दिवसांपासून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरु होता . या वेश्याव्यवसाय सुरु ठेवणारा त्रिमूर्ती लाॅज सील करुन कारवाई करण्याचे आदेश दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी यवत पोलिसांना दिले आहेत,ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.                                पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड तालुक्यातील बोरीभडक आणि हवेली तालुक्यातील उरळी कांचन  या दोन्ही तालुक्यातच्या शिवेवर असलेल्या त्रिमूर्ती लाॅज वर मागील अनेक दिवसांपासून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरु होता. हे ठिकाण कुंटनखाण्याचे ठिकाण बनले होते, दौंड, हवेली तालुक्यासह पुणे शहारातील अनेक तरुण या ठिकाणी येऊन वाममार्गाला लागत होते, तसेच पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करणारे अनेक वाहन याठिकाणी थांबत असत ,या लाॅज पासून काही अंतरावर च लोकवस्ती आहे याचा परिणाम येथील रहिवासी यांच्यावर होत होता, याची दखल घेत  स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायद्याचे  उल्लंघन करीत असलेल्या आणि  कुंटनखाण्याचे ठिकाण असलेल्या त्रिमूर्ती लॉज वर कारवाई होणेबाबत यवत पोलीस स्टेशन कडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता.त्यानुसार दौंड पुरंदर चे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी यवत पोलीसांनी पाठवलेल्या या प्रस्तावाची गांर्भीयाने दखल घेत हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून हा लाॅज सील करण्याचे आदेश दिले आहेत.  दरम्यान , पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या यवत पोलीसांच्या हद्दीत काही हाॅटेल आणि लाॅजवर वेश्याव्यवसाय सुरु आहेत यावर अशाप्रकारे कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
To Top