नीरा गोळीबार प्रकरणी तीघे ताब्यात : मुख्य आरोपी पोलीसांच्या टप्प्यात

Admin
पुरंदर : प्रतिनिधी
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------  

नीरा शहरात शुक्रवारी दोघांनी गोळीबार करत गुंड गणेश रासकरचा खुन केला होता. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीघा संशयीतांना जेजुरी पोलीसांनी ताब्यात घेतले असून आता गोळीबार करणारा मुख्य आरोपी पोलीसांच्या टप्प्यात आला असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यशस्वी होतील अशी खात्रीपूर्वक माहिती सुत्रांनी दिली आहे. 
         नीरा (ता.पुरंदर) येथील कुविख्यात गुंड गणेश रासकरच्यावर शुक्रवार (दि.१६) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबार झाला. जवळच्याच दोन मित्रांनी या गोळीबारात प्रत्यक्षात सभाग घेतला होता. मात्र या मागे अनेक सुत्रधार असण्याची शक्यता लक्षात घेत जेजुरी पोलीस सखोल तपास करत आहेत. प्रत्यक्ष घटनेवेळी गोळीबार करणाऱ्या संशयीताला दुचाकीवरून पळवून नेणाऱ्या पाडेगाव (ता.खंडाळा, सातारा) येथील निखिल उर्फ गोटया रविंद्र ढावरे या युवकाला त्याच्या घरातून सोमवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले. गोळीबार करण्यासाठी वापरलेले हत्यार काय असेल व ते कोठून आले याचा कसुन तपास पोलीस घेत आहेत. मंगळवारी त्यात त्यांना यश ही आले. हत्यार लोणी (ता.खंडाळा, सातारा) येथील संकेत उर्फ गोटया सुरेश कदम (वय २५) याचा असल्याचे निष्पन्न झाले व त्याला ही ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. तर गणेश रासकरचा पुर्वीचा अजून एक मित्र जाधव याला ही संशयीत म्हणून पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. 
          गुंड गणेश रासकर गोळीबार प्रकरणात आता तीघांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहाती सुत्रांनी दिली. बुधवारी सकाळ पर्यंत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश येणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.
To Top