वसई : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वसईच्या भुईगांव समुद्र किनारी (Vasai) एका सुटकेस मध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह (Female dead Body) मिळाला आहे. या महिलेची हत्या करून, मुंडक धडापासून वेगळं करून तो मृतदेह सुटकेस मध्ये भरून समुद्रात फेकलेला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वसईच्या भुईगाव समुद्र किनारी (Bhuigaon Beach) आज सोमवार ता 26 रोजी दुपारी 12 च्या सुमारास हा मृतदेह मिळाला आहे. या मृतदेहाची कोणतीही ओळख पटलेली नसून , मृतदेह ताब्यात घेऊन जेजे रुग्णालयात शवविच्छेदन (Postmortem) साठी पाठविण्यात आला आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police) अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा (Murder Case) दाखल करून, तपासासाठी स्वतंत्र 4 पथक रवाना केले असल्याची माहिती वसई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली आहे.
वसई पोलीस ठाणे हद्दीत भुईगाव समुद्र किनाऱ्या वर एक सुटकेस स्थानिक पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आली होती. सुटकेस मधून दुर्गंधी येत असल्याने, त्यात मृतदेह असावा असा अंदाज करून, पोलीस पाटील यांनी याबाबत ची माहिती वसई पोलिसांना दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे, पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन, सुटकेस ताब्यात घेऊन ती उघडली असता त्यात मुंडकी नसलेली फक्त महिलेचे धड मिळून आले आहे. महिलेची हत्या करून, तो मृतदेह सुटकेस मध्ये भरून, भरतीच्या समुद्रात फेकून आरोपी फरार झाले असावेत. ओहोटी ला ही सुटकेस किनार्यावर लागल्याने ही घटना उघड झाली आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या तपासासाठी स्वतंत्र 4 पथक ही तयार करण्यात आले आहेत.मात्र महिलेची ओळख पटवून, आरोपीना पकडणे पोलिसा समोर एक मोठे अहवान असणार आहे.
याआधी दोन मृतदेह आढळले
एकाच महिन्यात तीन मृतदेह वसई पोलीस ठाणे हद्दीत सापडले आहेत. दोन मृतदेह हे वसई पाचूबंदर समुद्र किनाऱ्यावर तर आज एक मृतदेह भुईगाव समुद्र किनाऱ्यावर सापडला आहे. 15 जुलैला अनोळखी पुरुषाचा मृतदेह किल्लाबंदरला सापडला होता. त्याआधी 12 जुलैला ममता पटेल या बेपत्ता असणाऱ्या महिलेचा किल्ला बंदर येथे मृतदेह सापडला होता. ममता पटेल या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या आणि त्या बेपत्ता झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला होता.