पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरंदर तालुका ओ.बी.सी. सेलच्या अध्यक्षपदी कर्नलवाडी येथील किरण माणिक गदादे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे व पुणे जि. कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांनी पुणे शहर कार्यालय येथे गदादे यांना नियुक्ती पत्र दिले.
यावेळी माजी जि.प.सदस्य बाबासाहेब माहुरकर, पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव उपस्थीत होते. पुणे जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, प्रुथ्वीराज निगडे, कांचन निगडे, बापुराव भोसले, बाळासाहेब रासकर, प्रमोद निगडे, अशोक भोसले, पोपट भोसले यांनी अभिनंदन केले.
या पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व ओ.बी.सी आणि बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे किरण गदादे यांनी सांगितले.