पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुरंदर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदरचा विकास होत आहे. त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध होत आहे. पुरंदरमध्ये विमानतळ असो की, अन्य कोणताही प्रकल्प पुरंदरकरांच्या विकासाचे प्रकल्प आपण राबवणार आहोत असे आश्वासन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी नीरा येथे दिले.
नीरा (ता.पुरंदर) येथे आज रविवार (दि.२५) रोजी पुरंदर हवेलीच्या आमदार संजय जगताप यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, नीरा गावच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जी.प.सदस्य दत्ता झुरुंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, प्रवक्ते विजय भालेराव, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, प्रहार जनशक्तीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ, माणिकराव चोरमले व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात आता आमदार संजय जगताप यांनी विकास कामांच्या भूमीपुजनाला सूरवात केली आहे. कोव्हिड नंतर आता त्यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. नीरा येथील प्रभाग दोन मधिल रस्ते, प्रभाग चार मध्ये एक रस्ता व ड्रेनेज लाईन, प्रभाग दोन मधील रस्ता व सर्वजनिक शौचालयाच्या बंधकामांचे उद्घाटन संजय जगताप यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रास्तवीक सरपंच तेजश्री काकडे यांनी केले. सूत्रसंचालन अँड.विजय भालेराव यांना केले तर आभार उपसरपंच राजेश काकडे यांनी मानले.