विद्या प्रतिष्ठान सुपे महाविद्यालयात रक्तदान शिबीर : राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि निसर्ग स्पर्श फाउंडेशनचा उपक्रम

Admin
सुपे : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि निसर्ग स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयाचा ६ वा वर्धापन दिन यांचे औचित्य साधून पंधरा तारखेला रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
         कार्यक्रमासाठी बारामती तालुका पाणी फाऊंडेशनचे समन्वयक मा.पृथ्वीराज लाड, निसर्ग स्पर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास वाघचौरे नेहरू युवा  केंद्राचे  प्रतिनिधी वैभव भापकर, सुपे परगण्यातील विविध दैनिकांचे पत्रकार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल पाटील ,इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील  इ. मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले
             यावेळी सर्व पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार जयराम सुपेकर. लोकमतचे दीपक जाधव. प्रभातचे सोमनाथ कदम व बाळासाहेब वाबळे. पुण्यनगरीचे सचिन पवार. पुढारीचे चे सुदाम नेवसे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक प्रा.अमर नांदगुडे यांनी केले,  कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि सुपे इंग्लिश मीडियम स्कूलचा शिक्षक वृंद,  बारामती ब्लड बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला
To Top