दोन लाखाच्या बदल्यात सावकारांनी दीड एकर जमीन बळकावली : वडगाव निंबाळकर चौघांविरोधात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील व्याजाने घेतलेल्या दोन लाख रुपयांच्या बदल्यात दीड एकर जमीन दोन वर्षासाठी  सावकारांना नावावर करून दिली मात्र दोन वर्षे पूर्ण झाल्यावर आरोपीना पैशाची अजून मागणी करत जमीन परत करण्यास नकार दिल्याने वडगाव निंबाळकर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
        याबाबत शालन भुजंग वाबळे, वय ५४ वर्षे, व्यवसाय मजूरी, रा. पवारवस्ती, देऊळगाव रसाळ, ता. बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी  दिपक बापुराव वाबळे,  सर्जेराव नाना वाबळे,  अनिल लक्ष्मण वाबळे,  राहुल रामदास वाबळे सर्व रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती, जि. पुणे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  यातील फिर्यादी यांनी आरोपी दिपक बापुराव वाबळे, याच्या कडुन १० रू टक्याने दोन लाख रू  २०१७ मध्ये घेतले होते त्या रक्कमे बदल्या फिर्यादी यांना आरोपी अ.ऩ.१ ते ४ हे व्याजाच्या पैशाची मगणी करत होते सदर व्याजाची रक्कम पाच लाख रूपये झाल्याने आरोपी नं १ ते  ४ हे फिर्यादी यांना त्रास देवु लागले तसेच आरोपी अ.नु.नं १ याने फिर्यादी यांना तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमचे दीड एकर क्षेत्र मला खरेदी खत करून द्या असे म्हणाल्या नंतर फिर्यादी यांनी आरोपी मजकुर अ.नं.१  यास दोन वर्षाच्या मुदती करा खरेदी खत करून देतो आम्ही तुमचे पैसे दिल्या नंतर खरेदी खत पलटी करून द्या असे म्हणाले त्यावर त्यांनी होकार दिल्या नंतर फिर्यादी यांनी दिनांक १६/२/२१ रोजी त्यांची जमीन गट नं ४८२ मधील दिड एक्कर क्षेत्र दुय्यम निबंदक कार्यालक दिड एकर शेत जमीन सातलाख रूपयामध्ये २ वर्षाच्या बोलीवर जमीन परत देण्याचे बोलीवर करून दिले   त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये  फिर्यादी हे ७ लाख गोळा करून आरोपी अनु नं  १ यांच्याकडे जावुन आमची जमीन परत  पलटी करून द्या असे म्हणाले असता त्याने तुम्ही मला अजुन व्याजासहीत दहा लाख रूपये द्या असे म्हणाला त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास आमच्याकडे एवढी रक्कम नाही असे म्हणाले असता त्याने मी जमीन परत देत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणाल्यालर आम्ही घरी आलो त्यानंतर देवुळ गाव रसाळ येथे येवुन व्याजाने पैसे देणारा इसम नामे राहुल रामदास वाबळे याच्याकडे जावुन आम्ही सण २०२० मध्ये ४ लाख ५० हजार मागितले असता त्याचे सावकारकीचे साथीदार  १ ते ४ यांनी संगणमत करुन व्याजापोटी जास्त रक्कम मागुन तेथून आम्हाला हाकलुन दिले. त्यानंतर आम्ही आज पर्यंत वेळोवेळी दिपक बापुराव वाबळे याला तुम्ही आमची जमीन पलटी करुन द्या असे म्हणालो परंतु वरील लोकांनी संगणमत करुन आम्हाला त्रास देऊन तुम्ही आमचेकडून व्याजापोटी घेतलेली रक्कम दिली नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली  वगैरे म।।ची फिर्याद वरून दाखल गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो.स. शेख  हे करीत आहेत.
To Top