राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरेत बैलगाडी मोर्चा काढत मोदी सरकारच निषेध ! मोदी सरकार हाय हाय !! महागाई कमी झालीच पाहिजे

Admin
नीरा ! सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

राज्यभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्य महागाई विरोधात आंदोलन छेडली आहेत. आज सोमावार (दि.०५) रोजी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोको आंदोलने केली जात आहेत. सकाळी १०:३० वाजता निरा येथील अहिल्यादेवी होळकर चौकातून बैलगाडीत मोटारसायकल व गँस सिलंडर घेऊन मोर्चा काढत छत्रपती शिवाजी चौकात प्रतिकात्मक रस्ता रोको करण्यात आला. मोदी सरकार हाय हाय !! महागाई कमी झालीच पाहिजे!! या मोदी सरकार विरोधी घोषणा देण्यात आले. 
निरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांनी उतस्फुर्तपणे नियोजन केले. शेतकऱ्यांचे प्रतिक असलेल्या बैलगाडीत, मोटारसायकल व घरगुती गँस सिलेंडरची फेरी काढण्यात आली. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताजीराव चव्हाण, महिला उपाध्यक्ष कोमल निगडे, कांचन निगडे, राजेश चव्हाण, नीरा शहर महिला अध्यक्ष तनुजा शहा, सरचिटणीस विष्णू गडदरे, दादा गायकवाड, धर्मेंद्र येवले, तालुका युवक अध्यक्ष अनिकेत सोनवणे, ऋषिकेश धायगुडे, आप्पा चव्हाण, अजय राऊत, अजित सोनवणे, महेश धायगुडे, जलील काझी, संतोष मोहिते, सुनील पाटोळे, उमेश चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, संजय चव्हाण, अनिकेत सोनवणे, मोहम्मद अली मुलानी   इत्यादी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तावीक सदस्य अनिल चव्हाण यांनी केले.
To Top