लोणी काळभोर : सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पाटस ( ता. दौंड) येथे दोघांना तलवार
काठ्यांनी मारहाण करून दगडाने ठेचून निघृणपणे केलेल्या दुहेरी हत्याकांडातील फरारी झालेले चौघे आरोपी १२ तासातच जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
याप्रकरणी महेश उर्फ मन्या संजय भागवत ( वय. २२), महेश वय २०, दोघेही रा. पाटस, तामखडा, ता. दौंड), युवराज रामदास शिंदे ( वय १९, रा. गिरीम, मदनेवस्ती, ता.दौंड व गहिनीनाथ बबन माने ( वय १९, रा. गिरीम, रोघोबानगर,ता.दौंड) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ४ ) रात्री १० वाजता पाटस येथील तामखडा वस्तीत भानोबा मंदिरासमोर महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ( दि. ४ ) रात्री १० वाजता पाटस येथील तामखडा वस्तीत भानोबा मंदिरासमोर महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन आई बहिणीवरुन शिवीगाळ करून दम दिला होता. शिवम संतोष शितकल ( वय. २३ ) व गणेश रमेश माकर ( वय. २३, दोघे रा. पाटस, अंबिकानगर, ता. दौंड) हे शिव्या का दिल्या याचा जाब विचारण्यासाठी तामखडा येथे गेले होते. त्यावेळी महेश भागवत, महेश टुले व अनोळखी साथीदारांनी शिवम शितकल व गणेश माकर या दोघांना तलवार, काठ्यांनी जबर मारहाण करुन खाली पाडून त्यांच्या डोक्यावर दगडाने घाव घालत निघृणपणे दोघांचा खून केला होता. या संदर्भात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस वरिष्ठ पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक
नेमण्यात आले होते.