बारामतीचे डॉ. भास्कर जेधे यांचा मुंबई येथे 'सन्मान देवदूतांचा' पुरस्कार देऊन गौरव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती येथील बारामती हॉस्पिटलचे डॉक्टर भास्कर जेधे यांचा करोना काळात झोकून देत रुग्णसेवा केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . 
       केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले , आरोग्य मंत्री  महाराष्ट्र राजेश टोपे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते "सन्मान देवदूतांचा"  पुरस्कार देण्यात आला . ह्या पुरस्काराच्या निमित्ताने डॉक्टर भास्कर जेधे , यांच्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली. 
डॉ. जेधे हे बालरोगतज्ज्ञ असल्याने खरं तर ते यापासून सहज दूर राहू शकत होते ...कोविड रुग्णास उपचार व मदत हे त्यांनी उस्फूर्त पणे केलेलं कार्य आहे . ज्ञान , अनुभव व अभ्यासाच्या जोरावर वेळोवेळी प्रशासनास योग्य मार्गदर्शन दिले . सेंटर मध्ये जाऊन रुग्णांना धीर दिला . उपचारांना दिशा दिली . रुग्णांच्या नातेवाईक ना धीरच दिला तर समुपदेशन ही केले . २४-२४ तास काम त्या ताणाच्या काळात केले . ह्या कामाची राज्यपातळीवर दखल घेतली गेली . बारामतीत कोविड चा बराचसा ताण कमी करण्यात मोठा वाटा डॉ. जेधे यांनी उस्फुर्त पणे उचलला.
To Top