नीरा येथील जुबिलंट कंपनीच्या युनियनमध्ये धक्कातंत्र : जुन्या पदाधिकाऱ्यांना पदच्युत करून यशवंत भोसले अध्यक्षपदी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

 बारामती व पुरंदरच्या सीमेवर असलेल्या ज्युबिलंट इनगव्हीया लिमिटेड, निंबुत निरा या कंपनीत युनियनमध्ये धक्कातंत्र पहावयास मिळाले. गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असलेल्या कामगार युनियन ला पदच्युत व्हावे लागले आहे या ठिकाणी कामगार नेते यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आहे. 
            अध्यक्षपदी यशवंत भोसले, उपाध्यक्ष शिवाजी लोखंडे, सेक्रेटरी अनिल कोंडे, खजिनदार दिलीप अडसूळ व सदस्य रमेश जेधे हे या युनियनचे पदाधिकारी असतील. असे सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी ५ जुलै रोजी जुबिलंट कंपनीला कळविले आहे. आज यशवंत भोसले यांनी नीरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली, भोसले म्हणाले की, आपल्या कंपनीमध्ये  ज्युबिलंट कामगार युनियन, निंबुत निरा, ता.बारामती, जि.पुणे हि मान्यताप्राप्त अंतर्गत संघटना कार्यरत असून पूर्वीच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी बहमत नसल्याने त्यांना पदच्युत करण्यात आलेले आहे.
त्याबाबतचे कार्यकारीणीच्या दिनांक ०२ जुलै २०२१ च्या बैठकीत खालील ठराव मंजूर करण्यात आलेले
आहेत. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीतील अहमतातील सदस्यांनी मानसेवी सदस्य व अध्यक्ष
 सतीश शिवाजीराव काकडे, उपाध्यक्ष सुरेश आनंदराव कोरडे, सरचिटणीस सुनीलदत्त तानाजीराव देशमुख तसेच खजिनदार नंदकुमार वसंतराव निगडे यांना त्यांच्या पदावरून हटविण्यात आले आहे. दिनांक ०२ जुलै २०२१ पासून ज्युबिलंट कामगार गुनियनचे कार्यकारणीवर मानसेवी सदस्य व संघटनेचे अध्यक्ष पदावर यशवंत आनंदराव भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांची नियुक्ती
करण्यात आलेली असून उपाध्यक्ष पदावर .शिवाजी परशुराम लोखंडे, जनरल सेक्रेटरी या पदावर अनिल दत्तात्रय कोंडे, खजिनदार या पदावर .दिलीप सर्जेराव अडसुळ व कार्यकारणी सदस्य या पदावर रमेश पांडुरंग जेधे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
             भोसले पुढे म्हणाले,  कंपनीतील ५ कामगार, पदाधिकारी व कमिटी सदस्य यांना संरक्षित कामगार म्हणून
 सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार कार्यालय, पुणे यांनी प्रमाणित केले असून तसा
आदेश देखील काढलेला आहे. तसेच घटनेनुसार कार्यकारिणीतील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याचे आदेश पत्र देखील त्यांनी आपणास पाठविलेले आहे. यापुढे नूतन कमिटी समवेत संघटनेचे सभासद असणाऱ्या कामगारांच्या हिताकरिता चर्चा करून सामंजस्याने मार्ग काढावे. कंपनीची प्रगती व कामगारांचे हित याकरिता आम्ही कंपनी व्यवस्थापनास पूर्ण सहकार्य करू असे यशवंत भोसले म्हणाले.
To Top