सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
काल सायंकाळी सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर झालेल्या हल्ला प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत सोनलकुमार उत्तम शेंडकर, वय २९ वर्षे, व्यवसाय हाँटेल रा.शेंडकरवाडी, ता.बारामती जि.पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी
गणेश उर्फ गोटया जगन्नाथ भंडलकर रा.मुरूम तवळवणीनगर ता.बारामती जि.पुणे,सोमा पवार,(पुर्ण नाव माहीत नाही ) वैभव हनुमंत चव्हाण अ.नं.2 व 3 रा.खामगाव साखरवाडी ता.फलटण जि.सातारा, 4) रणजित कैलास भंडलकर रा.जिती ता.फलटण जि.सातारा यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १ रोजी सायंकाळी पावणेसात च्या सुमारास सोरटेवाडी ता.बारामती गावचे हद्दीत निरा ते बारामती रोडलगत मुक्ताई हाँटेलवर
पार्सल सुविधा देत असताना तेथे आरोपी नं.1) गणेष उर्फ गोटया जगन्नाथ भंडलकर रा.मुरूम तवळवणीनगर ता.बारामती जि.पुणे, 2) सोमा पवार, 3) वैभव हनुमंत चव्हाण दोन्ही रा.खामगाव साखरवाडी ता.फलटण जि.सातारा, 4) रणजित कैलास भंडलकर रा.जिती ता.फलटण जि.सातारा यांनी हाँटेलमधील जेवनाचे पार्सलचे पैसे मागितलेचे कारणावरून चिडुन जावुनआरोपी नं.1) यांने ‘‘मी कोण आहे तुला माहित नाही का? मी बिलाचे पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर’’ असे म्हणत तो निघुन जात असताना फिर्यादीचा भाऊ विशाल याने त्यांना थांबवुन ‘‘ जेवणाचे पैसे दया, मग जावा’’ असे म्हणाला असता त्या सर्वानी फिर्यादीचे भावास ‘‘ तुझ्या आयच भोक, तुझा माज जिरवतो, तुला दाखवितो , तु आम्हाला बिलाचे पैसे मागतो काय, असे म्हणुन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली त्यावेळी फिर्यादी त्यांना म्हणाले की, तुम्ही शिवीगाळ का करता तुम्ही शिवीगाळ करू नका असे म्हणाले असता त्यातील आरोपी नं.1) हा ‘‘ हाना रे यांना, लई माज आलाय, आपल्याला बिलाचे पैसे मागतात काय, यांना आज ठेवायचे नाही. असे म्हणाला त्याचवेळी आरोपी नं.2) याने त्याचे कमरेला असलेला सत्तुर काढुन फिर्यादीचा भाऊ विशाल यास जीवे ठार मारण्याचे उददेषाने त्याचे डोक्यात मारला.व आरोपी नं. 1 ते 4 यांनी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ विशाल यांस मोठमोठयाने शिवीगाळ दमदाटी केली आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हायाचा प्रथमवर्ग रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ,कोर्ट बारामती याच्या कोर्टात रवाना केलेला आहे सदर दाखल गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शेलार हे करीत आहेत.