सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद येथे पेट्रोलिंग करत असताना एका व्यक्तीची संशयावरून अंगझडती घेतली असता त्याचेकडुन जिवंत काडतूसासह गावठी कट्टा आणि चाकू सारखे घातक शस्त्र आढळून आले.
या प्रकरणी घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार पुणे जिल्ह्यातील निरा गावाजवळील पिंपरे येथील पेट्रोल पंपावर पाचशे रूपयांचे पेट्रोल भरून पैसे न देता एमएच १२ केजी ३८२३ या क्रमांकांच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून पळालेल्या इसमाला लोणंद पोलीसांनी अडवून विचारणा केली असता तो गणेश सुभाष चव्हाण वय २९ रा. बेगमपूर ता मोहोळ जि सोलापूर असल्याचे निष्पन्न झाले असून त्याची वागणूक संशयास्पद वाटल्याने अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस आणि चाकू अशी घातक शस्त्र आढळून आली आहेत. सदर इसमावर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के.वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. गार्डे अधिक तपास करीत आहेत.