डॉक्टर्स डे च्या निमित्ताने कोऱ्हाळे बुद्रुक येथील डॉक्टरांचा पत्रकारांच्या वतीने सन्मान

Admin
 कोऱ्हाळे : सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 डॉक्टर्स डे चे औचित्य साधत बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोराळे बुद्रुक येथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा सन्मान करण्यात आला. 
   यावेळी डॉ.नंदकुमार यादव, डॉ. संजय कोकरे, डॉ. नितीन इंगळे, डॉ. प्रशांत शिरवाळे, डॉ. निंबाळकर मॅडम यांचा सन्मान बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन वाघ, भारतीय पत्रकार संघाचे सचिव सोमनाथ लोणकर, सामाजिक कार्यकर्ते बापूराव फणसे, संतोष माळशिकारे उपस्थित होते.
   यावेळी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी म्हणाले की कोरोनाच्या जागतिक महामंदीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व डॉक्टर बंधूंना जीवाची बाजी लावत रुग्णसेवा करण्याचे महान काम केले आहे. स्वतच्या जीवाची जोखीम पत्करून अनेक रुग्णांचे प्राण यांनी वाचवले आहेत. त्यामुळे पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
To Top