सोमेश्वरनगर नजीक सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर हत्यारबंद टोळीचा धुडगूस : एकावर कोयत्याने वार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज------

बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील मुक्ताई हॉटेलवर आज चार जणांच्या हत्यारबंद टोळीने धुडगूस घालून एकावर वार केला आहे. यामध्ये हॉटेलमधील एकजण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर साईसेवा आयसीयु हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत. 
          सविस्तर माहिती अशी की. आज सायंकाळी पाच च्या दरम्यान पाच लोक मुक्ताई हॉटेल येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आले.पार्सल जे बिल मागितले असता. या पाचही जणांनी कोयता व इतर हत्यारे काढून हॉटेलमध्ये धुडगूस घातला तसेच गल्यायातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाने अडवण्याचा प्रयन्त केला असता त्याच्यावर कोयत्याने वार केले आहेत. त्या युवकाला सहा टाके पडले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

सोमनाथ लांडे - सहाय्यक पोलीस निरीक्षक
सद्या हॉटेल ला बसून जेवण करण्याची परवानगी नाही . यावरून हा वाद झाला आहे. पळून जाताना एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी व्यक्तीचा जबाब घेऊन गुन्हे दाखल केले जातील. 
To Top