.देहु: सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
खासदार संभाजीराजे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आग्रही आणि आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भेटीगाठी, आंदोलनं, बैठका यामुळे त्यांचा दैनंदिन कार्यक्रम देखील व्यस्त आहे. मात्र, आज (दि.१) देहूत छत्रपती संभाजीराजे यांनी संत तुकाराम महाराज पालखी।प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला.
त्यांच्यासोबत गमतीदार प्रसंग घडला आणि उपस्थित वारकऱ्यांसह त्यांना देखील हसू आवरता आले नाही. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीचे आज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या प्रस्थान होणार आहे.सकाळपासूनच देहूत ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण जयहरी चा नामघोष आणि टाळ, मृदंगाच्या गजराने भक्तिमय।वातावरण निर्माण झाले होते. याचवेळी खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी.त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.मात्र,
फुगडी खेळता खेळता संभाजीराजेंचा तोल गेला आणि त्याच।क्षणी उपस्थित वारकऱ्यांनी त्यांना सावरलं. हा प्रसंग
अनुभवणाऱ्या वारकऱ्यांना आणि खुद्द संभाजीराजे यांना देखील हसू आवरता आले नाही.