सोमेश्वर मंदिराच्या वैभवात पडणार भर : लावली जाणार शोभेची २६०० विविध झाडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचा व परिसराच्या जिर्णोद्धाराचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मंदिर परिसरात आता भव्य बगीच्याची उभारणी केली जाणार आहे.  यामुळे  मंदिराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. 
      उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त व सोमेश्वर सहकारी साख़र कारखान्याचे माझी संचालक कै. दत्तात्रय दिनकर गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ या बगीच्या ची उभारणी केली जाणार आहे.  या बगीच्या मध्ये सोन चाफा, दुरंतो, गोल्डन सिप्रस इ. सारखी फुलांची व शोभिवंत २६०० रोपे लावली जाणार आहेत. ड्रीप सिस्टम द्वारे या बगीच्या साठी पाण्याची सोय केली जाणार आहे. या रोपांची योग्य ती निगा राखण्याची जबाबदारी सोमेश्वर मंदिर देवस्थान ने घेतली आहे. बगीच्या मुळे मंदिर परिसर प्रसन्न व हिरवागार होईल. ऋषी गायकवाड मित्रपरिवार व गायकवाड कुटुंबियांच्या संकल्पनेतून या बगीच्या ची उभारणी होत आहे. या बग़ीच्याची उभारनी युवक स्वता: च्या श्रमदानातुन करनार आहेत.
       या बग़ीच्या च्या भूमिपूजन प्रसंगी देवस्थान ट्रस्ट पुजारी, पदाधिकारी, ऋषि गायकवाड, अविराज गायकवाड, अमित गायकवाड, दिग्विजय मगर,संग्राम हुमे,प्रफुल लोणकर,सौरभ पवार,अक्षय गायकवाड,भूषण गायकवाड,प्रतीक गायकवाड,अविष्कार शिंदे,दिनेश शेंडकर उपस्थित होते.
To Top