कामगारांच्या आरोग्यासाठी सोमेश्वर कारखाना नेहमी दक्ष : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  

खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर कारखान्याने ५५० कामगारांचे मोफत कोरोना निदान शिबिर संपन्न झाले. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.,सोमेश्वरनगर आयोजित कारखान्यातील कर्मचारी व अधिकारी यांची अॅन्टिजन व आर.टि.पी.सी.आर. चाचणी बुधवार दि ३० रोजी पार पडली. या शिबिरास सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी उत्सपुर्तपणे प्रतिसाद देवुन ५५० कर्मचा-यांची चाचणी या शिबिरांमध्ये बारामती आरोग्य विभागामार्फत घेण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे शुभहस्ते झाले.
       या प्रसंगी बोलताना अध्यक्ष जगताप म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असुन आपण आज आपल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे कोरोना निदान चाचणीचे आयोजन केलेले आहे.आपण कारखान्याच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्यासाठी नेहमी दक्ष असतो यासाठी कारखान्याने सर्व कर्मचा-यांचा आरोग्य विमा उतरविलेला असुन त्याचा चांगला फायदा कर्मचा-यांना होत आहे. कारखान्याच्या प्रगतीत कामगार घटकाचा मोलाचा वाटा असल्याने आम्ही संचालक मंडळ कर्मचा-यांच्यासाठी कुठेही कमी पडणार नाही अशीही ग्वाही आपल्या मनोगतात व्यक्त केली.
          यावेळी बारामती लोकसभेच्या  खा. सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस संचालक मंडळाने केक कापून साजरा केला. या प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन .शैलेश रासकर ,संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, श्री सोमेश्वर
वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप काकडे व बाळासाहेब गायकवाड तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्यावे कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यानी केले व आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ मनोहर कदम यांनी केले.
To Top