उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निंबुत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २२ जुलै रोजी   वाढदिवसाचे औचित्य साधून निंबुत परिसरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती  प्रमोद काकडे व शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. 
        यामध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस पंच्चेचाळीस वर्षे वरील व्यक्तींना ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झालेत अशा ३०० लोकांना देण्यात आली. तसेच निंबुत गावातील लोकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमोद काकडे, सतिश काकडे, अभिजीत काकडे उपसरपंच अमर काकडे, डॉ सौरभ काकडे व गावातील इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
        

To Top