जुगार आड्यावर छापा, दोघांवर गुन्हा दाखल : वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे जुगार अड्यावर छापा मारत दोघाजनांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पो. कॉ. पोपट बाळू नाळे यांनी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अविनाश मधुकर जावळे वय ५२ व  अभिजीत लिंबाजी साळवे  दोन्ही रा. वडगाव निबाळकर ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश मधूकर जावळे रा. वडगाव निंबाळकर हा  आपले कब्जात बेकायदा बिगर परवाना कल्याण नावाचा जुगारीची साधने जवळ बाळगुन चोरून जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असताना जुगाराचे साधने व रोख रक्कम ३४० रूपये असा मुद्देमालासह मिळून आला त्यांच्याकडे चौकशी केली असता तो सदरचा कल्यान मटका जुगार हा अभिजीत लिंबाजी साळवे   रा. वडगाव निबाळकर ता. बारामती जि.पुणे  याचे सांगण्यावरून  घेत असल्याचे सांगत आहे. मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हयाचा प्रथमवर्ग वर्दी रिपोर्ट मा.जे.एम.एफ .सी सो,कोर्ट बारामती याच्या कोर्टात रवाना केला असुन  गुन्हा दाखल करुन पुढील तपास पो हवा फणसे आहेत.
To Top