सोयाबीनवरील खोड किड व पाने गुंडाळणारी अळी : किडींचे नियंत्रण व व्यवस्थापन : एस. ए. जायभाय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

सोयाबीन पिक सध्या 1 ते 3 आठवड्यांचे असून मागील दोन आठवड्यांपासून पावसाने ताण दिलेला आहे.
       कोरडया वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोड माशी (किड) व पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मादुर्भावाच्या प्राथमिक अवस्थेत या किडीचे व्यवस्थापन करणे हे सुदृढ पीलासाठी व त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असते. या किडींचे शास्त्रोक्त पद्धतीने नियंत्रण व व्यवस्थापन करण्याविषयी माहिती पुढील ममाणे देण्यात आली आहे.

 खोड माशीः प्रादुर्भावाची लक्षणे:
पानाच्या शिरादवारे या किडीची अळी सोयाबीनच्या खोडांमध्ये पवेश करून सोडाचा गाभा पोखरुन खाते.
• उगवणीपासून 7 ते 10 दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो, त्यामुळे
प्रादुर्भाव ग्रस्त रोपे पिवळी पडून मुकतात व मरून जातात,
• डोडापासून शेड्यापर्यत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानांवर.लालसर काळे ठिपके दिसू लागतात तसेच मानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडमला जातो व झाडे.वाळून मरून जातात. परिणामी शेतातील रोपांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते.
• पिकाच्या वाटीच्या नंतरच्या अवस्थेमध्ये खोरमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे मुकत नाहीत परंतू, खोट पोखरल्यामुळे शेगांधी संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले
जात नाहीत.

नियंत्रण व्यवस्थापनः
• 10 ते 15% प्रादुर्भावग्रस्त झाडे, ही या किडीची आर्थिक नुकसान मर्यादा समजावी व नियंत्रणात्मक उपाययोजना करावी.
• पेरणीच्या वेळी थायमेथोक्झाम 70 बी.एस. ची 3 गेम प्रती किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी किंवा,
• पीक 7-10 दिवसांचे असताना किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच कलोरोपायरीफॉस 20 टक्के इ.सी.
15 लि. प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के इ.सी. 800 मी.ली. पति हे. किंवा इथोफेनपॉक्स 10 इ.सी. 1
लि. प्रति हे. किंवा क्लोरंभंजिली पोल 18.5 टक्के एस.सी. 150 मी.ली. किवा इथिओन 50 टक्के इ.सी.
1500 मी.ली. किंवा थायमेथोक्झाम 25% WG 75 गॅम प्रति है. 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये मिसळून
पिकावर फवारावे.
पाने गुंडाळणारी अळी, प्रादुर्भावाची लक्षण:
• या किडीच्या अळ्या सुरवातीस पाने पोखरुन त्यावर उपजीविका करतात.
• हि कीड एक किंवा अधिक पाने एकमेकाम जोडून पानाध्या सुरळीत राहून त्यावर जगते. पिटकलेली पाने
उघडून पाहील्यास किळीची विष्ठा दिसते. परिणामतः प्रादुर्भाव झालेली पाने गळून परतात. सोयाबीन
पिकामध्ये गुंडाळलेली पाने दिसल्यास या किडीचा प्रादुर्भाव झाला असे समजावे.

नियंत्रण व्यवस्थापन:
• या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकावर क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लि. प्रति है. किंवा इंडोक्झाकार्ब
11.5 एम.सी. 500 मि.ली. प्रति हे. किंवा रायनॅक्सीपायर 20 एस.सी. 100 मि.ली. प्रति हे. किंवा
ट्रायझोफॉस 40 इ.सी. 800 मि.ली. प्रति हे. यापैकी एका कीटकनाशकाचा 500 ते 700 लि. पाण्यात
मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.

ए. एस. जायभाय
शास्त्रज- सोयाबीन सुधार योजना
आघारकर संशोधन संस्था, 
पुणे: 411 004 
मोबा. 7588559910
To Top