सोमेश्वर रिपोर्टर टीम------
थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कोव्हीड योध्दे यांचा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलेली सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या वतीने वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर व मस्कचे वाटप केले. पंचायत समितीचे सदस्य व गटनेते प्रदीप धापटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व कोवीड योद्धे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच.रेखा बनकर, उपसरपंच .कल्याण गावडे, पोलीस पाटील नितीन थोपटे , ग्रामसेवक. मिनाज मुलानी. ग्रामपंचायत सदस्य , कोवीड व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.