शेतकरी राजाला शिवारात साथ देणाऱ्या बैलांचा बेंदूर उत्साहात साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

शेतकरी राजाला शिवारात मशागतीला साथ देणाऱ्या बैलांचा आज बेंदूर सण मोठ्या उत्साहात आज साजरा  करण्यात आला.
     झुल घातलेले , रंगाच्या चित्राने बैल सर्वाना आकर्षित करत होते. बेंदूर सण हा पावसाळ्यात येतो. पावसाळ्यात बऱ्यापैकी मशागती शेतकरी राजा उरकून घेतो. कारण पाऊस असताना शेतातील कामे कमी असतात. सोमेश्वरनगर परीसरात मोठ्या प्रमाणात उसाची शेती आहे. उसाच्या लागणी उरकल्याने शेतकरी सद्या निवांत आहे. आपल्या बैलांचा बेंदूर सण उत्साह हात साजरा करण्यासाठी आणि बेंदूर सणाची वाट पाहणारी शेतकरी ही अनेक आहेत. माणूस वर्ष भरात अनेक सण साजरे करतो. पण, आपल्या शिवारात आपल्याला मशागत करायला कायम साथ देणाऱ्या सर्जा-राजाचा सण वर्षातून एकदाच येतो. तो मोठ्या उत्साहात साजरा करावा .असा प्रत्येकाला वाटत असते. त्याला साजेशी अशी सजावट करण्याची तयारी आठवडा भर अगोदरच सुरू होते.
      सोमेश्वरनगर परीसरात  सर्जा-राजाची उत्साहात कोरोणाचे नियम पाळून सध्या पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. ढोल -ताशा अश्या मोठ्या उत्साहात साजरा होणारा बेंदूर सण  कोविड काळ असल्याने सर्वत्र सध्या पध्दतीने साजरा झाला. आणि आपल्या सर्जा-राजाची सजावट करून अनेक शेतक-यांनी बेंदूर सण साजरा केला. 

To Top