पवना नदीला पूर : चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली

Admin

पुणे : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

चिंचवड येथील पवना नदीला आज दि . २२ रोजी पुर आला आहे . यामुळे  श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर पाण्याखाली आले आले असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .
           चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली असलेले असलेल्या मंदिरांपैकी मोरया गोसावी समाधी  मंदिर  पवना नदी काठी आहे . गेल्या दोन दिवसापासून पावसांच्या संततधारेमुळे व पवना  धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे नदीपात्रात   मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग  करण्यात आला आहे . आज पहाटेपासून नदीचा पुर वाढत चालला होता .यामुळे  पवना नदीस पुर  आला आहे आज सकाळी ९ वाजता  श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर पाण्याखाली आले आहे . हे पाहण्यासाठी अनेक भावीकांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती . आज सायंकाळी उशीरापर्यंत मंदिर पाण्याखाली होते . या वर्षीच्या पावसाळा ऋतू चालु झाल्यापासून  पहील्यांदा मंदिरास पुराच्या पाण्याने जलाभीषेक झाला आहे .
To Top