सोमेश्वर रिपोर्टर टीम------
गेल्या अनेक दिवसांपासून निसर्ग आपल्या विविध छटा दाखवत आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस, ऊन आणि ढग ...जणू काही एकमेकांशी शिवणा पावणी खेळत आहेत. सूर्य आपल्या सूर्यकिरणांच्या विविध चटणी पृथ्वी नाहून काढत आहे. काल बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखाना सूर्याच्या अद्भूत पिवळ्या किरणांनी सोनेरी मुलामा दिला होता....आमचे प्रतिनिधी तुषार धुमाळ यांनी दि १६ रोजी सायंकाळी हे छायाचित्र टिपले आहे.
मागील दहा पंधरा दिवसांत महाराष्ट्रात सर्वदूर वरुणराज्याने चांगली हजेरी लावली आहे. काळ्या गडद ढगांच्या दाटी मधून सूर्य अधूनमधून डोकावत आहे. काल सायंकाळी सहा वाजता मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे सोमेश्वर कारखान्यावरती पडली आणि सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या जणू काही कारखान्यावर सोन्याचा मुलामा चडल्याचा भास निर्माण होत होता.