संतोष भोसले : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सध्या सोशल मिडीयावर धुमाकुळ घातलाय तो ओ...शेठ
तुम्ही नादच केलाय थेट.. या गाण्याने, आवघ्या वीस दिवसाच्या कालावधीत ३८ लाख लोकांनी हे गाण पाहिलय.. मराठी रसीकांच्या मनात उडत्या चालीची गाणी नेहमीच हिट ठरतात. ऐण सणासुदीच्या तोंडावर नविन गाणी येतात यातील काही गाणी चांगलीच हिट होतात. यंदा दहीहांडी नाही. सार्वजनिक गणेशोत्सोव नाही. पण करमणुकीचे साधन बनल्या गेलेल्या मोबाईलवर
गेल्या वीस दिवसांपासुन धम्माल, ठसकेबाज, ढिंगच्याक अस हे गाणं सातत्यानं ऐकायला मिळतय. तरूणाईला तर वेडच लावलं आहे. ज्याचा मोबाईल पहावा. त्याच्या
स्टेटसवर ओ..शेठ हे एकच गाणं आहे. मुख्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून सोशल मिडियावर युवकांनी वाढत्या पेट्रोल, डिजेल, गॅस व इतर महागाईचे रेट व नेते मंडळींचे फोटो एडिटींग करून महागाईला नियंत्रण ठेवण्यासाठी नेतेमंडळींचे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आवडत्या व्यक्तीच्या फोटोचा व्हीडीओ बनवत त्यावर हे गाण लावल जात आहे.
२७ जुन २०२१ रोजी प्रस्वर अज्ञा रेकॉर्डींग स्टुडीओ उस्मानाबाद येथुन गाणं प्रदर्शीत करण्यात आल. उमेश गवळी हे गायक आहेत तर संध्या केशे आणि प्रणिकेत खुने यांनी लिहुन संगीत दिले आहे. यु ट्युबमुळे सर्वसामान्य कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. याचा पुरेपुर फायदा तरूणाई घेताना दिसतेय. मराठी गाणी, नाटीका, संवाद, वेब सिरिज, विनोदी कथा सादर करून तरूणाई आपले नशीब आजमावत आहे. यातील काही भाग हीट होउन सादर करणाऱ्यांना सुपरहीट तर बनवतात आणि पैसा प्रसिद्धीही मिळवुन देतात. किती दिवस हे गाणं चालतय हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. असे आहेत गाण्याचे बोल जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली. नावाला तुमच्या डिमांड आली. ओ शेsssठ तुम्ही नादच केलाय थेट... ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
-------------