पोलीस नाकाबंदीत सापडले गावठी पिस्तुल : एकावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मार्गासनी : प्रतिनिधी

वेल्हे तालुक्यातील अस्कवडी येथे पोलीस नाकाबंदीत
तपासणी करत असताना एका गाडीमध्ये गावठी पिस्तुल
सापडल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीती वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
       याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अस्कवडी येथे काल रात्री ८ वाजता नाकाबंदी करत असताना नसरापुर वेल्हे रस्त्याने एक मारुती सियाज गाडी जात होती. चौकशीसाठी या गाडीस थांबवले असता येथील गाडीमध्ये गावठी पिस्तुल आढळुन आले. याप्रकरणी रोहन दिगंबर हिंगमिरे (वय २१) भवानी पेठ पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज पवार आणि त्यांच्या पथकाने केली.
To Top