सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणी काळभोर उरुळी कांचन येथील गारवा
हॉटेल चे मालक रामदास आखाडे यांच्यावर आज
(रविवारी ) रात्री पाऊने दहा वाजण्याच्या सुमारास
किरकोळ कारणावर तीन जणांनी तलवारीने हल्ला
केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हल्लेखोर 3 जण असले तरी वरील हल्ला कोणी व
का केला याबाबत काहीही समजलेले
नसून, लोणी काळभोर पोलीस घटना स्थळी नुकतेच पोचले
आहेत. पोलीस पुढील माहिती घेत आहेत. दरम्यान अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात रामदास आखाडे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.