तो आला... त्याने पाहिले ...आणि सात जणांना अक्षरशः फोडून खाल्लं....

Admin
मेढा : सोमनाथ साखरे
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

मेढा नगरीमध्ये बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असुन मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. अनेक निरापराध लोकांचा चावा घेतला असल्याची खळबळजनक घटना दुपारी घडली असताना नगर पंचायत मात्र मोकाट कुत्र्यांकडे फक्त बघ्याची भुमिका घेत असल्याने जनतेत नाराजी पसरली आहे .मेढ्यात टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून जुने एसटी स्टँड, पवार टॉव्हर्स, पंचायत समिती तसेच वेण्णा चौक परिसरात सामान्य लोकांना फिरताना भितीचे वातावरण निर्माण होत आहे. पहाटे मुंबई वरून येणारे लोक तसेच पहाटे फिराय साठी बाहेर पडणारे स्त्री पुरुष मुले आपला जीव मुठीत घेवुन फिरायला जात आहेत . 
        आज (दि. १८ ) रोजी दुपारी अचानक एका कुत्र्याने चावा घेण्यास सुरुवात केली. भर चौकात सुरू झालेल्या या हल्ल्यामुळे सात लोकांना सातारा येथिल सिव्हील हॉस्पीटल गाठावे लागले आहे. यामध्ये लक्ष्मी पांडूरंग मर्ढेकर रा. मेढा, पांडुरंग शिंदे रा . दुंद मुरा, गणपत स . जवळ रा. जवळवाडी, विष्णु राजाराम सुतार व पांडुरंग श्रीरंग चौधरी दोघे रा.मोहाट आणि विष्णु दत्तु जाधव रा. गोगावले वाडी यांचा समवेश आहे . या व्यतीरिक्त आणखी लोक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .
            मेढ्यामध्ये असणाऱ्या मटण दुकानां जवळ या कुत्र्यांचा जमाव जमत असुन मटणांच्या दुकानातील टाकावु मांस खाण्यासाठी कुत्र्यांची आपापसात भांडण लागत आहे . या भांडणात सामान्य माणसाचा जीव जाण्याची भिती निर्माण होत आहे .मेढा नगरपंचायतीने या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावी अशी नेहमी मागणी सामान्य जनतेकडून होत असली तरी नगरपंचायत फक्त बघ्याची भुमिका बजावत असल्याने त्यांच्या गलथान कारभाराबाबत जनतेत नाराजीचा सुर उमटत आहे . मेढा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने विविध कामा निमित्त परगावचे लोक मोठ्याप्रमाणात येत असतात . त्यामुळे नगर पंचायतीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतुन जोर धरत आहे .
To Top