ग्रामपंचायतच्या माजी सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या : पुरंदर तालुक्यातील प्रकार

Admin
वाल्हे : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

पुरंदर तालुक्यातील  पिंगोरी येथील ५४ वर्षीय व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .ज्ञानेश्वर सर्जेराव यादव असे त्यांचे नाव असून ते ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृत देह शवविच्छेदणासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
           या बाबत स्थानिक लोकांनी दिलेली माहिती अशी की ,पिंगोरी गावातील  कवडेवाडी येथे राहणारे ज्ञानेश्वर सर्जेराव यादव  यांनी त्यांचे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.यादव शेतात गेल्या नंतर त्यांचा मुलगाही त्याच्या नंतर शेतात गेला असता त्याला यादव हे  फासी घेतलेल्या आवस्थेत आढळून आले. यानंतर या घटनेची माहिती पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन तसेच वाल्हा दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.वाल्हे दुर्क्षेत्राचे पोलीस कर्मचारी गणेश दाभाडे,पोलीस पाटील राहुल शिंदे व होमगार्ड के.एम.यादव यांनी घटनास्थळी जाऊन मयाताचा पंचनामा करून  मयत यादव यांचे शव जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. दरम्यान जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटना स्थळाला भेट दिली आहे. आणि घटने बाबाची अधिकची माहिती घेतली.याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून जेजुरी पोलीस अधिकचा तपास करीत आहेत
To Top