सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुरूम (ता. बारामती) येथे रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभवअंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षण, कृषी क्षेत्रातील आव्हाने, वाढती लोकसंख्या व शेतीवरील ताण याबद्दल कृषीकन्या ऋतुजा सोनवणे हिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शास्त्रीय पध्दतीने माती परिक्षण केल्याने जमिनीतील अन्नघटकांचे प्रमाण, जमिनीचा पोत याची माहिती मिळण्यास मदत होते त्यामुळे गरजे इतकेच खते शेतकरी वापरु शकतो. महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस.एम. एकतपुऱे, प्रा. एस.आर.आडते, प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ऋतुजा सोनवणे हिने शेतकऱ्यांना मातीचा नमुना कसा घ्यायचा, कोणत्या ठिकाणी घ्यावा, कोणत्या ठिकाणी घेऊ नये याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी मुरुम येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय कोरडे आणि प्रशांत कोरडे उपस्थित होते.
ल